Type Here to Get Search Results !

वणी-विरकुंड बसफेरी सुरू करण्याची मनसेची मागणी

वणी :

      वणी ते विरकुंड अशी स्वतंत्र बससेवा सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आगार व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ  यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सध्याची बससेवा अपुरी पडत असल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे.

                सध्या वणी ते बोर्डा अशी बससेवा सुरू आहे. मात्र, ही बस बोर्डा येथून परत येताना विरकुंड गावापर्यंत पोहोचल्यावर पूर्ण भरलेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना बसमध्ये चढता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून, गावकऱ्यांनाही प्रवासासाठी अडचणी येत आहेत.

            या समस्येवर तोडगा म्हणून, वणी ते विरकुंड अशी नवीन बस फेरी सुरू करण्याची मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी केली आहे. यामुळे प्रवाशांचा त्रास कमी होऊन त्यांना सुरक्षित आणि वेळेवर प्रवास करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

             यावेळी निवेदन देताना विलन बोदाडकर, सूरज काकडे, प्रवीण कळसकर, धीरज बगवा, विनोद वैद्य,हिरा गोहोकार यांच्या सह सरपंचा वर्षा मडावी, अमोल पारखी, रवी पारखी, राकेश परचाके, शंतनु बावणे सोहेल शेख यांच्यासह शालेय विद्यार्थी, महिला आदी उपस्थित होते. आगार व्यवस्थापकांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad