वणी :
लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल देशमुखवाडी, येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत, प्रचंड उत्साहात आयोजित करण्यात आला. यावेळी राधा कृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधेची वेशभूषा करून सहभाग घेतला.
प्रारंभी शाळेचे अध्यक्ष व माजी आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून पालकांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला तसेच चिमुकल्यांना गोपाळकाल्याचे वितरण करण्यात आले.
उत्सवाच्या यशस्वितेसाठी ज्येष्ठ शिक्षिका सौ. मीरा काळे, सौ. संध्या बेदडेवार, सौ. जया सरमोकदम, सौ. कविता मोहितकर, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या