वणी :
लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 15 ऑगस्ट 2025 रोजी 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.देशमुखवाडी येथील शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाने झाली. शाळेचे अकॅडेमीक डायरेक्टर प्राचार्य प्रशांत गोडे यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि राष्ट्रगीताने वातावरण भारावून टाकले. यानंतर विद्यार्थ्यांनी राज्यगीत, देशभक्तीपर गीत, नृत्य आणि नाट्य सादरीकरण केले.
प्राचार्यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्याचे महत्त्व, तरुण पिढीच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला आणि सर्वांना स्वातंत्र्याच्या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.
संचालन सौ रंजू झाडे व सौ भामिना वाढई यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप मधुर देशभक्ती गीतांनी आणि विद्यार्थ्यांना मिठाईचे वितरणाने झाला.





