वणी :
येथील लायन्स हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नरेंद्र नगरवाला यांच्या हस्ते, वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मान्यवर, विद्यार्थी , शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य सर्वश्री बलदेव खुंगर , दत्तात्रय चकोर, सुधीर दामले, रमेश बोहरा, चंद्रकांत जोबनपूत्रा,किशन चौधरी, राजाभाऊ पाथ्रडकर, पुरूषोत्तम खोब्रागडे महेंद्र श्रीवास्तव, सौ मंजिरी दामले, सौ विना खोब्रागडे, प्रमोद देशमुख,प्रा. डॉ अभिजीत अणे, भिकमचंद गोयंनका, नंदू शुगवाणी, अकॅडेमीक डायरेक्टर प्रशांत गोडे व प्राचार्य चित्रा देशपांडे मंचावर उपस्थित होते.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादर केले व उत्स्फूर्त भाषणे दिली. तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी विद्यालयाच्या मैदानात वृक्षारोपण केले.
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला विद्यालयाचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार व मान्यवरांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे कौतुक केले व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन पौर्णिमा खिरटकर व मोना पाईकराव यांनी, तर आभार विकास चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या