महावितरण वणीचे नवीन कार्यालय राम शेवाकर परिसरात सुरू झाले आहेस. हे वणीकरांसाठी अतिशय आनंदाची वार्ता आहेस. परंतु दूसरा मजला आणी तीसरा मजला दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक कार्यालयात प्रवेश करु शकत नाही. Security Guard ची कार्यालय खाली मार्गदर्शनासाठी व्यवस्था करावी. अपंग व्यक्तींना शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सुलभरीत्या प्रवेश मिळावा यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
यात रॅम्प, लिफ्ट, तसेच अपंगांसाठीच्या विशेष सोयसुविधा उपलब्ध करुण देणे शासन निर्णय आहेस. शारिरीक, बौद्धिक संवेदनाक्षम आणि विकासात्मक दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांच्या /उपक्रमांच्या माध्यमातून विभागाकडून सहाय्य केले जावे ही अपेक्षा.
ज्येष्ठ नागरिकांचे स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हाने घालविता यावा, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक/मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे धोरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. ०९ जुलै २००८ रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहे.
येत्या ७ दिवसात अपंग व्यक्तींना, ज्येष्ठ नागरिकसाठी रॅम्प, लिफ्ट सुविधा न झाल्यास प्रहार तर्फ़े डेरा आंदोलन करण्यात येईल. मोबिन शेख उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे, रघुवीर कारेकर तालुकाप्रमुख प्रहार शेतकरी संघटना, शहरप्रमुख वाहतुक आघाडी सचिन राखुंडे, शहरप्रमुख अहमद सैय्यद उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या