मुकूटबन :
झरी जामनी तालुक्यातील मुकूटबन येथे दिनांक ८ मार्च २०२५ ला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ' सुजाण पालकत्व ' (Effective Parenting Workshop) या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये डॉ अशोक कोठारी यांनी मुलांच्या अभ्यासिक समस्या, त्यांची वर्तणूक,पालकांची वागणूक विषयावर प्रकाश टाकणारी कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थी दशेत प्रत्येक पालक आपल्या मुलांना समजून घेतो का?मुलं हट्टी का होतात ? मुलामुलींना किती प्रमाणात स्वतंत्र दिले पाहिजे ? मुलांना परीक्षेत मिळणारे गुण आणि त्याची सर्वांगीण विकास याचा संबंध काय ? मुलामुलींना मोबाईल पासून दूर कसे ठेवावे? या विषयावर उपस्थित महिला पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. लता मधुकरराव गादेवार, प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद पन्नामे, मंगेश गादेवार, नीनान चेरीयन, निलेश चौधरी होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता ठाकरे, सूत्रसंचालन प्रगती कूटकिलवार, तर आभार महेश चुक्कलवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या