या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व शिक्षक व कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.सौ. सुनीता अनिल बुटे यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवर शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यांनतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी 40 वर्षांनी वर्गमित्रांची भेट झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.
कार्यक्रमाचे संचालन नत्थु चौधरी तर आभार प्रदर्शन विवेक देशपांडे यांनी केले. स्नेहमिलन सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अनंता शिवरकर, अंबादास चव्हाणकर, नत्थु चौधरी, अशोक बुरडकर, हरीश दरबेशवार, विवेक देशपांडे, ओमप्रकाश पिंपळकर, नरेंद्र गायकवाड, नरेंद्र सुराणा, गणपत गंधारे, उत्तम बलकी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा शेवट विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून केला.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या