येथील सुशगंगा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे दोन टप्पे पूर्ण करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सुलभक म्हणून प्रा. आनंद अनिल हूड, प्रा. गणेश महादेव लोहे, प्रीतेश मुरलीधर लखमापुरे, हेमंत तिमांडे, गोपाल शिरपूरकर, सुनील झाडे, वृषाली देशमुख, प्रमुना भोयर यांनी काम केले. या प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर यांच्या मार्गदर्शनात साधन व्यक्ती विनोद नासरे यांनी काम केले.
शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राज्य अभ्यासक्रम आराखडा, पायाभूत स्तर आणि शालेय शिक्षण 2023 व 24, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यासंदर्भात माहिती देऊन जी 128 मानके प्रत्येक शाळेच्या मुल्यमापना साठी देण्यात आले आहेत. त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया त्यांची त्यातील मूल्यांकन आणि संकल्पना क्षमता आधारित मूल्यांकनाची कार्यनीती कशा पद्धतीने आहे. त्यावर आधारित प्रश्न प्रकार कशा पद्धतीने असणार आहे. आणि प्रश्न निर्मितीचे कौशल्य कसे विकसित करायचे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत समग्र प्रगती पत्रक, समग्र प्रगती पत्रकाची संकल्पना व पार्श्वभूमी सांगण्यात आली. या समग्र प्रगती पत्रकाचे स्थानीय स्वरूप कशा पद्धतीने असले पाहिजे या सर्वांसंदर्भात सखोल माहिती देऊन त्यावर चर्चा करण्यात आली. सर्वात शेवटी तयार करण्यात आलेल्या प्रत्येक गटाचे गटकार्य घेऊन शिक्षकांनी या प्रशिक्षणामध्ये काय मिळवलं त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण करून घेण्यात आले.
या प्रशिक्षणाचा प्रत्येक टप्पा हा पाच दिवसाचा होता. इयत्ता सहा ते 12 वी पर्यंत शिकविणाऱ्या तालुक्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण हे तीन टप्प्यात होणार असून दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत. तिसरा टप्पा दिनांक 10 मार्च पासून लोकमान्य टिळक महाविद्यालयात सुरू झाला आहे. तो 15 मार्च पर्यंत चालणार आहे.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या