वणी :
पोलिसांनी मोमिनपुरा परिसरात केलेल्या धडक कारवाईत अवैध गोवंश कत्तल व मांस विक्रीचा प्रकार उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ७० ते ८० किलो गोवंश मांसासह कत्तलीसाठी वापरण्यात येणारे धारदार सत्तूर, वजन काटे, खिमा मशीन व इतर साहित्य असा एकूण ३३ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खात्रीशीर माहितीच्या आधारे मा. पोलीस निरीक्षक श्री. गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. निलेश अपसुंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक श्री. धीरज गुल्हाणे, पो.हवा. बारसागरे, ना.पो.का. विशाल राठोड, पो.का. श्याम घुघे, पो.का. नंदकुमार पूप्पलवार, पो.का. गणेश मेश्राम, म.पो.का. पल्लवी बल्की तसेच चालक पो.का. अरविंद यांचा समावेश होता. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कनले यांनी जप्त मांसाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी घेतले आहेत.
आरोपींविरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास ना.पो.का. विशाल राठोड, पोलीस स्टेशन वणी हे करीत आहेत. अवैध कत्तल व बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे वणी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या