Type Here to Get Search Results !

मनसे वर्धापनदिनानिमित्त रुग्णांना फळवाटप

वणी :

          मनसेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त आज पक्षाच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले गेले. याचंच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने वणी, मारेगाव व झरी येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

      रुग्णांना फळे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून केला जातो. मनसे कार्यकर्त्यांकडून रुग्णांना फळवाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जातो. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णसेवा हेच खरी ईश्वरसेवा हे ब्रीद घेऊन अनेक कार्यकर्ते रुग्णांना फळवाटप केले. 

        यावेळी माजी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, गोविंदराव थेरे, अंकुश बोढे, विलन बोदाडकर , महेश हातगावकर शंकर पिंपळकर, विठ्ठल हेपट, सुनील पानघाटे, आकाश काकडे, वैभव पुराणकर, विजय चोखारे, गोवर्धन पिदूरकर, गुड्डू वैद्य, अमर पाचभाई, प्रतीक बुरडकर, प्रवीण कळसकर, मंगेश येटे, दीपक चांदेकर, जगदीश पारोधी, शिरीष भवरे,श्रीकांत माम्मीडवार यांच्या सह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad