यवतमाळ जिल्हा परीषद अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रकाशवाट दाखविण्यासाठी, स्पर्धा परीक्षेत ग्रामीण विद्यार्थी सदोदित यशस्वी व्हावे या हेतूने घेण्यात आलेल्या महादिप परीक्षेत जिल्हा परीषद वरीष्ठ प्राथ. शाळा ढाकोरी ता. वणी जि. यवतमाळ च्या कु. दिक्षा मांडवकर आणि कु. कालेश्वरी घोरपडे विद्यार्थिनी घवघवीत यश मिळवून विमानवारीसाठी पात्र झाल्या.
आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी यवतमाळ येथे बक्षिस समारोह कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आ. मंदार पत्की साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून त्यांचे कौतुक कऱण्यात आले. विद्यार्थीना प्रेरित करणारे वणी पंचायत समिती चे गटशिक्षण अधिकारी आ. स्नेहदीप काटकर सरांनी पात्र विद्यार्थीचे कौतुक केले व शैक्षणिक सहलीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच तालुका समन्वयक आ. विनोद नासरे सर यांचाही सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. शाळेचे प्र. मुख्याध्यापक आ. बालाजी बीडगर सर, विषय शिक्षिका कु. मीनल बेझलवार मॅडम,स. शिक्षिका कु. माधुरी कावडे मॅडम या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या शैक्षणिक सहलीला भरभरून शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या