प्रतिनिधी / नागपूर (मंगेश राऊत ) :
तुळसिरामजी गायकवाड पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, मोहगाव,नागपूर च्या विद्युत अभियांत्रिकी विभाग (NBA मान्यताप्राप्त), सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी १९ मार्च २०२५ रोजी “MSEDCL ३३/११KV सबस्टेशन, गुमगाव, नागपूर” येथे औद्योगिक भेट आयोजित केली.
या भेटीचा उद्देश विद्युत वितरण व ग्रीड व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या संकल्पनांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवून देणे हा होता. एकूण ७० विद्यार्थ्यांनी या भेटीत सहभाग घेतला.
या भेटी दरम्यान श्री. रुपेश कापसे (कनिष्ठ अभियंता, MSEDCL) यांनी विद्युत व्यवस्थापन आणि वितरण प्रक्रियेबद्दल सखोल माहिती दिली. तसेच, श्री. अजित चव्हाण (ऑपरेटर, MSEDCL) यांनी सबस्टेशनमधील प्रमुख घटक जसे की पॉवर ट्रान्सफॉर्मर, सर्किट ब्रेकर, आयसोलेटर, करंट ट्रान्सफॉर्मर (CT), पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर (PT) आणि संरक्षण प्रणाली (रिले) यांचे कार्य व त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांनी वीजपुरवठा अखंड ठेवण्यासाठी सबस्टेशनच्या भूमिकेवर प्रकाश टाकला तसेच भार व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.
ही औद्योगिक भेट विद्यार्थ्यांसाठी सैद्धांतिक आणि प्रत्यक्ष औद्योगिक ज्ञान यामधील दुवा निर्माण करणारी ठरली. यामुळे त्यांना वीज व ऊर्जा क्षेत्रातील करिअर संधींबाबत अधिक माहिती व प्रोत्साहन मिळाले.
या भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी मा. व्यवस्थापन, प्राचार्य डॉ. पी.एल. नाकतोडे, उपप्राचार्या डॉ. प्रगती पाटील, तसेच विभागप्रमुख प्रा. गणेश वकते यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच, प्रा. प्रितेश म्हैसकर आणि प्रा. प्रफुल घाडगे यांनी उत्कृष्ट समन्वय साधून ही भेट यशस्वी केली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या