वणी :
या वणीला हे कसलं ग्रहण लागलंय? वात्सल्यपूर्ण भावना, आपली सामाजिक प्रतिष्ठा, किमान लोकलज्जा… या सगळ्या भावभावनांना केवळ वासनेच्या विचाराने पराभूत केले ? लैंगिक आकर्षण भावना इतकी मोठी झाली की आपल्या संवेदना मेल्या ? सेक्स अपील इतके मोठे झाले आहे की माणसाचा माणुसकीवरील विश्वास उडावा आणि संवेदनशील मने पिळवटून जावे ? असे या घटनांमधून वाटते..
वणी शहरातील निर्गुडा नदीजवळील एका वीट भट्टयाजवळ मतिमंद युवती १ मे रोजी दुपारच्या सुमारास विटांचे तुकडे गोळा करण्यासाठी गेली होती. विटांचे तुकडे गोळा करताना अचानक तिथे एक नराधम पोहोचला. त्याने तरुणीस पकडले व तिला लाथाबुक्यांनी मारहाण केली. नराधमाने तिला गॅस गोडावूनच्या मागे काटेरी झुडुपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने घडलेल्या घटनेबाबत वडिलांना सांगितले. फिर्यादी वडिलांनी तत्काळ वणी पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी पीडित युवतीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. वणी पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीविरुद्ध कलम 64(1), 64(2) (1), 138,76,115 (2) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अनोळखी नराधमाचा शोध घेत आहे. पुढील तपास पीएसआय धनंजय रत्नपारखी करीत आहे.
वणीला या विकृतीपासून वाचवण्यासाठी कठोर शिक्षा करत एक प्रकारची कायद्याची दहशत बसावी असा पवित्रा आता पोलीस प्रशासनाला घ्यावा लागेल.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या