वणी :
विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी, मारेगांव , झरी तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक वणी येथे महाराष्ट्र दिनाचा निषेध करण्यात आला. आजचा दिवस विदर्भासाठी काळा दिवस पाळण्यात आला. विदर्भाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
केद्र सरकारणे विदर्भाचे वेगळे राज्य निर्माण करावे, शेतकर्यांची संपुर्ण कर्जमुक्ती करावी, अन्नधान्याची जीएसटी रद्द करावी, विजेचे दर कमी करण्यात यावे. या मागण्यासह इतरही मागण्यासाठी समिती आग्रहक झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपुर्ण विदर्भात सालाबादाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र दिनावर बहिष्कार टाकण्यात आला.
१ मे १९६० रोजी विदर्भाला भावनिक आवाहन करीत मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्यावेळी नागपुर करार करण्यात आला होता.पण त्या करारातील अटींची पुर्तता न झाल्यामुळे विदर्भात अनेक समस्या निर्माण झाल्यात. शेतकरी आत्महत्या, बेकारी, कुपोषण, नक्षलवाद, विविध क्षेत्रातील अनुशेष आदी समस्या विदर्भाच्या वाट्याला आल्यात. त्या दिवसापासूनच विदर्भाची लुट सुरु झाली.पश्चिम महाराष्टातील नेत्यांनी विदर्भातील खनीज संपती, कोळसा, विज, वनसंपदा, शेतमाल, यांचे शोषण केले. मागील ५०-६० वर्षांपासून विदर्भाला भिकार अवस्थेत आणून सोडले. त्यामुळेच महाराष्ट् दिन विदर्भासाठी काळा दिन आहे. समितीद्वारे येथील जनतेची दिवसेंदिवस होत असलेली पिळवणुक केंद्र सरकारच्या लक्षात आणून सुध्दा त्यावर कोणताच सकारात्मक तोडगा काढण्यात आलेला नाही.
विदर्भातील प्रस्तावित धरणे पुर्णत्वास येऊ न शकल्यामुळे पुर्व व पश्चिम विदर्भातील एकूण १४ लाख हेक्टर जमिन सिंचनाखाली आणता आली नाही. अड.मधुकरराव किंमतकर यांच्या पुस्तीकेप्रमाणे विदर्भातील सिंचनाचा अनुशेष ६०हजार कोटीच्या वर गेलेला आहे. सोबतच शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते,विद्युतीकरण, आदिवासी विकास, ग्राम विकास, समाज कल्याण या क्षेत्राचा अणुशेष १५००० हजार कोटीच्या वर गेलेला आहे. या सर्व अनुशेषाचा परिणाम वाढती बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, हवालदिल सुशिक्षित तरुण वर्ग यांचे चरीत्र भयावह आहे.
महाराष्ट् राज्यात विदर्भावर नेहमीच अन्याय होत आलेला आहे. विदर्भात मुबलक खनिज, कोळसा, वनसंपदा, सुपिक जमिन, बारमाही वाहणार्या नव्या, विद्युत निर्मिती केंद्र, राजधानी साठी आवश्यक असणार्या सुविधा नागपुरात आहेत. या सर्व बाबी असतानाही विदर्भ उपेक्षितच राहीला. महाराष्टात राहून विदर्भाचा विकास श्यक्य नाही. विदर्भातील जनतेच्या सर्वांगिण विकासाकरिता स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव उपाय आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समिती मागील १३वर्षापासून सातत्याने विविध आंदोलन करिता आहे. सत्तेत असणारा भाजप असो वा कांग्रेस असो या पक्षांनी खोट्या आश्वासनाशिवाय काहिही केलेले नाही. विदर्भाचे स्वतंत्र राज्य मिळाल्याशिवाय समिती स्वस्थ बसणार नाही.वेळ पडल्यास प्राणाची बाजी लावु परंतु विदर्भाचे स्वतंत्र राज्य मिळवून घेऊ.
या आंदोलनात यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा. पुरूषोत्तम पाटील यांचेसह रफिकभाई रंगरेज, विदर्भ सचिव अँड.राहुल खारकर, प्रा.बाळासाहेब राजुरकर, नामदेवराव जेनेकर, देवराव धांडे, दशरथ पाटील, बालाजी काकडे, अनील गोवारदिपे, संजय चिंचोलकर, होमदेव कनाके, देवा बोबडे, व्हि.बि.टोंगे, पुंडलिक पथाडे, मोरेश्वर वासेकर, गणपतराव पिंपळशेंडे, प्रकाश नागतुरे, अजय धोबे, प्रा.अनिल टोंगे, भाऊ आसुटकर, अशोक चौधरी, रामजी महाकुलकर, गजेंद्र भोयर, भारत जेऊरकर, लक्ष्मण इदे, सुरेश राजुरकर, भाऊराव लखमापुरे, प्रभाकर मोहितकर, प्रभाकर उईके, आनंदराव पाणघाटे, अक्षय कवरासे, धिरज भोयर, आशिष रिंगोले, सुजित गाताडे, नितीन तुराणकर, अमित उपाध्ये, पुंडलिक जुनघरी, गजानन खाडे आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या