वणी :
वणी विधानसभेतील वणी - मारेगाव तालुका जोडणारा जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत येणारा मुर्धोनी ते वेगाव या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन आज तारीख २८ रोजी सायंकाळी ५ वाजता आमदार संजय देरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला वर्ग, युवक, तसेच स्थानिक नेते व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदा सदस्य तालुका पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित होते. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. खराब रस्त्यामुळे गावकऱ्यांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आमदार संजय देरकर यांनी विशेष प्रयत्न करून रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करून घेतला आहे.
भूमिपूजनप्रसंगी आमदार संजय देरकर म्हणाले, "ग्रामविकासासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही माझी प्रथम जबाबदारी आहे. मुर्धोनी- वेगाव रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी अधिक निधी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरूच राहतील, असेही सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेगाव ग्राम पंचायतीचे सरपंच्या उषाताई देरकर तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच दीपक कळसकर, सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिनेश मोहितकर, माजी जि.प. सदस्य अनिल देरकर,करण किंगरे समस्त ग्राम पंचायत सदस्य, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानत त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले आणि आभार प्रदर्शन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मारेगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व शिवसेना उबाठाचे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य, युवक मंडळ, महिला मंडळ, तसेच सर्व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या