नृत्य प्रशिक्षिका गुरुरत्न कु. पुजा धनवटे यांनी मोलाची कामगिरी करत चिमुकल्याना घडविल्याबद्दल तसेच बालकांना घडविण्याचा वसा घेतल्याने या प्रसंगी त्यांचा गौरव करत गुरुरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांचे जोरदार प्रदर्शन
0
वणी :
महाराष्ट्रातील वर्धा येथे दिनांक 25 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 दरम्यान तीन दिवशीय राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धा "नृत्योत्सव-3" या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय कला मंच व सचिन डान्स अकाडमी यांच्या संयुक्त विदयमाने करण्यात आले होते. या राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेमध्ये वणीतील चिमुकल्या स्पर्धाकांनी आपल्या नृत्याचे जोरदार प्रदर्शन करत वणीची शान उंचावली आहे.
या राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेमध्ये कु. भार्गवी विरेंद्र महाजण, कु.युक्ता सहारकर, कु.क्रिष्मा चाणना,दिशा केशवाणी.कु. उर्वी प्रणित बांगडे, कु. सिया सचिन डोर्लीकर, कु. मुग्धा सचिन डोर्लीकर, चि. आरुश सुधीर पांडे, कु सिद्धी कोंडावार कु. ध्रुवीया रासेकर यांनी "नृत्योत्सव-3" या स्पर्धेमध्ये सहभाग घेवुन राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेत वणीतील कु भार्गवी वीरेंद्र महाजन वय 7 वर्ष, युक्ता सहारकर, क्रीष्मा चाणना, दिशा केशवाणी या चिमुकल्यानी आपल्या कलेचे जोरदार प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावीला तर कु.उर्वी बांगडे ,कु. सिया डोर्लीकर, कु मुग्धा डोर्लीकर, कु.ध्रुवीया रासेकर, चि.आयुश पांडे ,कु.सिद्धी कोंडावार, या चिमुकल्याणी तृतीय पारितोषिके पटकावीत कलेचे जोरदार प्रदर्शन करत वणीची राष्ट्रीय पातळीवर शान उंचाविली.
या बाबत असे की, अशा नृत्य स्पर्धा दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येत असुन या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील स्पर्धक भाग घेत असतात.याआधी हिच स्पर्धा छत्तीसगड येथील दुर्ग,महाराष्ट्र राज्यातील नांदेड व गोवा येथील पणजी येथे तसेच भारतातील अनेक राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये सुद्धा याच स्पर्धाकांनी पारितोषिक पटकाविले होते.
राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेमध्ये वणीतील चमूंनी बाजी मारणे, हे वणीकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. वणीतील चमुंनी राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धेत विजय मिळवित पारितोषीके पटकाविल्याने सर्वच स्पर्धकांचे व नृत्य प्रशिक्षिका यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून अभिनंदना चा वर्षाव करण्यात येत आहे. स्पर्धकांनी या विजयाचे श्रेय त्यांचे आई वडील व नृत्यगुरु पूजा धनवटे व गुरूजनांना दिले आहे.
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या