मारेगाव :
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मारेगाव शहरात दि. २९ एप्रिल २०२५ रोजी जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम शासकीय विश्रामगृह येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी प्रहारचे नेते रघुवीर कारेकर उपस्थित होते.
यावेळी तालुकाध्यक्ष पदी जयंत गोवर्धन उईके, तालुका उपाध्यक्ष पदी संकेत ज्ञानेश्वर मानकर, कोषाध्यक्ष पदी अभिजीत देवराव सोयाम, तालुका संघटक पदी आकाश लक्ष्मण नांदे, तालुका सचिव पदी योगेश विलास गानफाडे, रुग्णसेवक पदी विशाल मिलमिले यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र जिल्हाप्रमुख आशिष तुपटकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रहार तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे मार्गदर्शन यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या