वणी :
ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत श्री. भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सव निमित्त वणी येथे बहुभाषिक ब्राम्हण समाजातर्फे जैताई देवस्थान येथून मोटर सायकल रॅली काढून संपूर्ण वणी शहरातील प्रमुख मार्गानी फिरविण्यात आली. या नंतर जैताई मंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या मोटर सायकल रॅलीमध्ये बहुसंख्येनी समाजातील भगिनीं व बंधूनी सहभाग घेतला. श्री. बाळासाहेब सरपटवार, श्री. राजु उंबरकर, श्री. मुन्नामहाराज तुगणायात यांच्या हस्ते महाआरती आणि पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता त्रिवेदी मेवाडा ब्राह्मण समाज, श्री. नितीन उंबरकर, श्री. सुधीर दामले आणि ब्राह्मण समाजातील लोकांनी आर्थिक सहकार्य केले.
रॅली समाप्ती नंतर विद्यावाचस्पती श्री. स्वानंद पुंड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला पहेलगाम हल्यातील मृत भारतीय शहीदना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला बहुसंख्येनी बहुभाषिक ब्राह्मण समाजातील बंधू भगिनी उपस्थित होते.
राजाभाऊ पाथरडकर अध्यक्ष वणी ब्राह्मण सभा आणि बहुभाषिक ब्राह्मण संघ. यांच्या प्रमुख उपस्थिती होती. मुलचंद जोशी, उज्वल पांडे, चंद्रशेखर खोंड, श्रावण देशकर, प्रवीण पाठक, अमित उपाध्ये, वैभव मेहता, श्रुती उपाध्ये, सुनील तुगणायात यांनी योगदान दिले. विशेष सहकार्य श्री. विजय चोरडिया यांचेही लाभले. किरण बुजोने यांनी या कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या