वणी :
लायन्स इंटरनॅशनल द्वारा चंद्रपूर येथे आयोजित रिजन कॉन्फरन्स मध्ये लायन्स क्लब वणी चे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांना लायन्स क्लब प्रेसिडेंट म्हणून इंटरनॅशनल पिन आणि सन्मान पत्र व बेस्ट लायन इन द रिजन IV अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच लायन्स क्लब वणी ला बेस्ट सर्व्हिस अँक्टिव्हिटी डिस्ट्रिक्ट अवॉर्ड व बेस्ट एज्युकेशनल अँक्टिव्हिटी इन द रिजन अवॉर्ड, लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४एच 1 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ डॉ. रीपल राणे, रिजन IV चे रिजन चेअरपर्सन डॉ. श्रीकांत जोशी यांचे हस्ते व झोन चेअरमन दिपक मोरे, माजी प्रांतपाल शैलेश बागला व डॉ विलास मुळे यांच्या उपस्थितीत लायन राजाभाऊ पाथ्रडकर व लायन पुरुषोत्तम खोब्रागडे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
रिजन कॉन्फरन्स मध्ये मागील वर्षी सुद्धा बेस्ट प्रेसिडेंट अवार्डने सन्मानीत करण्यात आले तसेच लायन्स क्लब वणी ला सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक उपक्रम राबविल्या बद्दल पुरस्कृत करण्यात आले होते. या सन्माना बद्दल लायन्स क्लब चे पदाधिकारी व सदस्य सर्वश्री माजी आमदार, लायन संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रमोद देशमुख, किशन चौधरी, बलदेव खुंगर, शांतीलाल पांडे, तुषार नगरवाला, सुधीर दामले,दुर्दाना अहमेद, नरेंद्र बरडिया, दत्तात्रय चकोर, शमीम अहमद, रमेश बोहरा, डॉ के. आर. लाल, चंद्रकांत जोबनपुत्रा, महेंद्र श्रीवास्तव यांनी अभिनंदन केले तसेच सर्वच स्तरांतून लायन्स क्लब वणी चे अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या