नागपूर :
दरवर्षी राज्यभरातून हजारो पुरणपोळ्या वाचून गरजूंना पुरविण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते. पूजा करून होळीला पोळीच्या नैवेद्य अर्पण केला जातो. क्षणार्धात पोळी जळून खाक होते, याच पोळीने देशातील दारिद्र्यरेषेखालील कोट्यावधी देश बांधवांच्या पोटात पेटलेली भुकेची होळी काही जणाबाबत एक वेळ तरी शांत होईल ना, भुकेल्याला अन्न हाच खरा धर्म ही संत गाडगे बाबांची शिकवणूक प्रत्यक्षात येईल. पोळीची चवच माहीत नसणाऱ्या या देश बांधवांचा विचारच होळीत पोळी टाकलण्यापासून आपल्याला परावर्तन करू शकतो.
शहरातील रस्त्याची दुरावस्था हा नेहमीच नागरिकांच्या नाराजीचा विषय असतो. आपल्याच पैशातून तयार केलेले डांबरी रस्ते होळीमुळे खराब होतात हे टाळण्यातच सुजाण नागरिकत्व नाही काय? होळीच्या सणातील आनंदाचा सामुदायिक जीवनाचा भाग कायम ठेवायचा; परंतु त्याला काल सुसंगत विधायक रूप द्यायचे हा प्रयत्न गेली ३५ वर्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे.
होळी केली जाते पण कशाची ? सण साजरा करू इच्छिणाऱ्या भागातील लोकांनी एकत्र एक जमायचे. स्वतःची शक्ती, वेळ यांचा मेळ घालत आपल्या आजूबाजूचा जमेल तेवढा परिसर झाडून लख्ख करायचा. जमा होणाऱ्या कोरड्या कचऱ्याची होळी पेटवायची. त्याचबरोबर माणूस म्हणून आपणा सर्वात असणाऱ्या दुर्गुणांचा एक प्रतिकात्मक पुतळा करायचा. त्याच्या विविध भागांना आळस, कामचुकारपणा, भ्रष्टाचार अशी नावे द्यायची त्यापासून मुक्त होण्याचा संकल्प करीत त्या पुतळ्याची होळी पेटवायची. लोक जमलेले असतातच. त्यांना पर्यावरणाचे महत्त्व थोडक्यात समजावून सांगायचे आणि सर्वांनी मिळून स्त्री सन्मानाच्या घोषणा बुलंदपणे द्यायच्या. असे शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर सांगायचे.
आज व्यसनमुक्तीची होळी पण साजरी केली पाहिजे. ती पण आम्हा विवेकी विचाराच्या हातून केल्या जाते. देशात व्यसनाचे वाढते प्रमाण थांबता थांबेना. अशावेळी व्यसनी पदार्थांची प्रतीकात्मक होळी केली जाते. आता यामध्ये नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ही राज्य पातळीवरची संघटना पुढाकार घेऊन समविचारी संघटनांना सोबत घेऊन पर्यावरण पूरक होळ्या साजर्या करण्यात येतात.
होळी टाळा पर्यावरण राखा. झाडे लावा झाडे जगवा. होळी टाळा इंधन वाचवा अशा घोषणांनी दुमदुमणाऱ्या फेऱ्या देखील होळीच्या निमित्ताने काढल्या जातात. प्रथा निर्मू या नवी निराळी.. करूया मंगळाची होळी यातून आपल्याला नशा मुक्त भारत उभा करायचा आहे.
यावर्षी कोराडी शाखेने थेट सुजाण नागरिकांना आव्हान केले आहे की जे कुटुंब होळीत अन्न न टाकता ते अन्न जसे की साखरेच्या गाठ्या, नारळ, पुरणपोळीचे नैवेद्य अशी खाद्यपदार्थ अंनिस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अनाथ विद्यार्थ्यांपर्यंत देतील. अशाच सुजाण नागरिकांना एक झाडाचे रोपटे देऊन होळीच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल असे आव्हान यावेळी केले आहे. बघूया किती खाद्यपदार्थ सुजाण नागरिक वाचविता ते ?
विवेकाचा आवाज बुलंद करूया...








टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या