वर्तमान स्थितीमध्ये जातीवरून फार मोठ्या प्रमाणात राजकारण केल जात आहे.यातून मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार सुद्धा होत आहेत.त्यामुळे समाजातील एकता आणि एकात्मता बाधित होत आहे अशा स्थितीत संविधानिक मूल्यांचे जतन, संवर्धन करायचे असेल तर वेगवेगळ्या जातीतील लोकांना एकत्र कसे करता येईल? परस्परांमधील संवाद कसा वाढविता येईल याबाबत सतत चर्चा होणे गरजेचे आहे तसेच आंतरजातीय/ आंतरधर्मीय विवाहाचे जैविक व बौद्धिक दृष्ट्या काय फायदे आहेत हे समजून सांगत अशा विवाहाना पाठबळ दिले तरच जातीअंताच्या दिशेने आपण वाटचाल करू असे प्रतिपादन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आनंद करंदीकर पुणे यांनी केले.
स्थानिक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहर व जिल्हा शाखेतर्फे शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवार दिनांक ११ मार्च २०२५ रोजी आयोजित १६० व्या अभ्यास वर्गात केले. स्थानिक अनेकांत स्वाध्याय मंदिरात आयोजित “जातीअंतासाठी करू काही“ या विषयावरील अभ्यास वर्गाचे अध्यक्ष म्हणून आधारवड चे अध्यक्ष डॉ हाशम शेख तर प्रमुख अतिथी म्हणून सत्यशोधक समाज संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ. अशोक चोपडे, तालुकाध्यक्ष अरुणभाऊ चवडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल मुर्डीव, जातीअंतासाठी सातत्याने कार्यरत असणारे पुणे येथील सरिता आवाड, सुरेंद्र जोंधळे, प्रथमेश गावंडे, अनिकेत साळवे उपस्थित होते.
प्रारंभी सरिता आवाड यांनी जाती अंताची दिशा याबाबत आपली भूमिका मांडली त्यानंतर आनंद सरानी आंतरजातीय विवाह केल्याने आनुवंशिक रोगाचे प्रमाण कमी असते आणि मुल ३५ टक्के अधिक शिक्षणासाठी सक्षम असतात असे अहवाल सांगत भारतीय संविधान चांगले कसे आहे हे समजून सांगितले तसेच सुरेंद्र जोंधळे यांनी भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये सांगून आमचे हक्क सरक्षित आहेत काय? असा प्रश्न करीत संविधानिक मूल्यांचे जतन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असे आवाहन केले.
यावेळी डॉ. अशोक चोपडे व अध्यक्ष डॉ. हाशम शेख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या अभ्यास वर्गाचे प्रास्ताविक राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, सूत्रसंचालन राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे तर आभार जिल्हा कार्याध्यक्ष अरुण भोसले यांनी केले. आयोजनासाठी राज्य पदाधिकारी सारिका डेहणकर, जिल्हा पदाधिकारी सुनील ढाले, निखिल जवादे, तनू वराडे, डॉ माधुरी झाडे, पांडुरंग राजरत्न सर, प्रतिभा ठाकूर, कल्पना सातव फुसाटे,मनिष फुसाटे रजनी सुरकार, संघर्ष डहाके , ज्योती भोसले, नंदकुमार वानखेडे ईत्यादिंनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या