प्रतिनिधी/कोरा (मंगेश राऊत) :
चिखली (उमरी) येथे कुकुटपालन (पोल्ट्री फार्म) असल्यामुळे गावातील नागरिकांना आरोग्याचा अनेक समस्या भेडसावत आहे. कुकुटपालनाची परवानगी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात उमरी गावातील नागरिकानी तहसिलदाराणा निवेदन दिले.
ग्रामपंचायत चिखली अतर्गत मौजा उमरी येथे कुकुटपालन (पोल्ट्री फार्म) असून प्रोडक्शन सुद्धा सुरु आहे. या कुकुटपालनाचे शेड गावाला लागून असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. गावातील नागरिकांचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. कुकुटपालन (पोल्ट्री फार्म) मुळे आजूबाजूचे असलेले शेतकरी शेती करू शकत नाही आहे. कुकुटपालनाच्या दुर्गंधीमुळे शेकडो लोकांना गंभीर आजार सुद्धा झाला आहे. अनेक जेष्ठ नागरिक, लहान मुले दुर्गंधीमुळे बिमार होत आहे. त्यांचे जबाबदार कोण आहे ? त्यामुळे कुकुटपालनाची तातडीने परवानगी रद्द करण्यात यावी. अन्यथा संपूर्ण गावातील गावकरी रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेईल व मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल नंतर जे काही प्रतिसाद उमटेल त्यांचे सर्वस्वी जबाबदार शासन / प्रशासन राहील असे निवेदन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात उमरी गावातील नागरिकानी तहसिलदाराना निवेदन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटींग पाटील, समुद्रपूर शहर अध्यक्ष मधुकर कामडी, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा सरचिटणीस गजानन शेंडे, गणेश वैरागडे, कोरा सरपंच वैशाली लोखंडे,सरपंच प्रफुल उसरे,ईश्वर पोफळे, उमरी उपसरपंच विठ्ठल नन्नावरे, ग्रा. सदस्य मेघाताई कुमरे, सदस्या रंजना कानमोडे, सदस्या सविता उइके, युवक तालुका अध्यक्ष तुषार थूटे, अतुल चौधरी, सोहम शेंडे, जिल्हा सचिव सोनू मेश्राम, युवक शहर अध्यक्ष शक्ती गेडाम,रोशन थूटे, सुरेश भगत, विनोद बाभूळकर, श्रावण महाजन, राजू गव्हाण, मनोज देवतळे,प्रतीक गणवीर आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या