प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत स्वयंपाकी, पालक यांची तालुकास्तरीय पाककला स्पर्धेचे आयोजन येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात दिनांक 25 फेब्रुवारीला करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रकाश नगराळे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी निलेश हेडाऊ, राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार हे उपस्थित होते.
या स्पर्धेत वणी तालुक्यातील 16 शाळांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेअंतर्गत पहिल्या टप्प्यात शाळा स्तरावर पाककला स्पर्धा घेऊन त्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना या तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी व्हायचे होते. तृणधान्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांची स्पर्धा होती. यात स्पर्धकांनी विविध दर्जेदार पदार्थ तयार केले. या पदार्थांचे परिक्षण शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाच्या शिक्षिका ज्योती महेश बडे, विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या विजया बाबुराव देवाळकर यांनी केले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पाच हजार रुपये जि.प.उच्च प्राथमिक शाळा कृष्णाणपुरच्या कोमल चिकनकर, द्वितीय क्रमांक साडेतीन हजार जि.प.प्राथ. पिंपळगावच्या सारीका चिंचोलकर, तृतीय क्रमांक दोन हजार रुपये जि.प. उच्च प्राथमिक शाळा निवलीच्या सविता मोहीतकर यांनी मिळविला.
या कार्यक्रमात उपस्थित अतिथीनी पोषण आहाराचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना परसबागेतील भाजीपाला वापरून येथे तयार करून दाखविण्यात आलेल्या पदार्थांचे सुद्धा आहारात समावेश करण्यात यावा. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवराव चिडे , सुत्र संचालन अल्का काळे यांनी केले. आभार प्रदर्शन सपना वासेकर यांनी केले. या स्पर्धेचे आयोजन शापोआ समन्वयक बुद्धराज वनकर यांनी केले.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या