येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी मोहित चैतन्य धनेगावकर याची विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (१५ वर्षांखालील) ‘भास्कर जोशी मेमोरियल’ स्पर्धेसाठी यवतमाळ जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
मोहितला बालपणापासूनच क्रिकेटची विशेष आवड असून, वडील चैतन्य धनेगावकर तसेच लायन्स स्कूलचे क्रीडा शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि क्रिकेटप्रती असलेले समर्पण कायम ठेवले. याच मेहनतीच्या जोरावर त्याला व्ही.सी.ए.च्या जिल्हा संघात स्थान मिळाले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, मागील वर्षीदेखील लायन्स स्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थिनी स्वरा मंगेश करंडे हिची व्ही.सी.ए.च्या विदर्भ महिला क्रिकेट संघात निवड झाली होती. त्यामुळे शिक्षणासोबतच दर्जेदार क्रीडापटू घडविणारी संस्था म्हणून लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष व माजी आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, संचालक शमिम अहेमद, नरेंद्रकुमार बरडीया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. के. आर. लाल, रमेश बोहरा, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्य चित्रा देशपांडे, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोहितचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या