वणी :-
प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल हिणकस व गलिच्छ वक्तव्ये करून बदनामी केली आहे. तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. मराठा समाजाला शिवीगाळ करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर व्यक्तीने ही वक्तव्ये व धमकी देत असल्याने हे प्रकरण संवेदनशील आहे.
🎯 प्रशांत कोरटकर या व्यक्तीने संबंधित ऑडिओ कॉलमध्ये पुढील वक्तव्ये केली आहेत :
१) ब्राह्मणांच्या शासनात तुम्ही काम करत आहे हे लक्षात ठेवा. २) बाजीप्रभू नसते तर तुमचा महाराज जीवंत नसता. ३) तुमचे महाराज पळून गेले. ४) जेम्स लेनचे पुस्तक वाचा, लोकांना सांगा जेम्स लेनने काय म्हटले आहे, व्हू इज बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, हे लोकांना सांगा. ५) ब्राह्मणांना कमी समजू नका, तुम्हाला ब्राह्मणांची ताकत दाखवतो, मग तुम्ही कितीही मराठे एकत्र करा. ६) छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालजी पेंढारकर हा ब्राह्मण होता, नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता माहीत पडलं नसतं. ७) *** रेकॉर्ड कर तुझ्या बापाला, ब्राह्मणांना बोलशील ना तर तुझी *** मारून टाकेन *** ८) ज्यादिवशी ब्राह्मणाचा शब्द काढशील त्यादिवशी परशुरामाचा परशू तुझ्या *** घुसवील *** ९) तुला तिथं येऊन मारीन. १०) तुला घरात येऊन मारीन ***..
सदर ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांच्या वॉलवर उपलब्ध आहे. राज्य सरकार, गृह विभाग व पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करून घेण्यात किंवा कारवाई करण्याबाबत गांभीर्य दाखवले नाही, तर संभाजी ब्रिगेड व सर्व शिवप्रेमींच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करून अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिल्या जातील.
यावेळी अजय धोबे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, जयसिंग पा. गोहोकर, देवराव पा. धांडे, विनोद मोहितकर, प्रवीण खानझोडे, अंबादास वाघदरकर तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ, नामदेव जेणेकर, भाऊसाहेब असुटकर, ॲड. अमोल टोंगे, ॲड. आकाश निखाडे, आशिष रिंगोले, दत्ता डोहे, सुरेंद्र घागे, कृष्णदेव विधाते, नारायण गोडे, बालाजी काकडे, मारोती जिवतोडे, विनोद बोबडे, देवेंद्र ताजने, सूर्यभान पिदूरकर, रामदास पखाले, अनंत मोहितकर, अरुण डवरे, नरेश मुरस्कर व इत्यादी शिवप्रेमी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या