Type Here to Get Search Results !

सावर्ला येथील घरकुल लाभार्त्यांना रेती उपलब्ध करून द्यावी - प्रवीण खानझोडे

वणी :
       सावर्ला येथील  घरकुल लाभार्थ्यांना नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने वणी पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल मंजूर होऊन त्याचा  १५,००० रुपयाचा पहिला हफ्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला. त्यानुसार त्यांनी राहते घर उकलून घरकुल बांधायच असल्याने तात्पुरती राहायची व्यवस्था केली. मात्र रेतीचा अभाव असल्याने घरकुल लाभार्थ उघड्यावर आले आहे.

  सावर्ला येथील घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार साहेब वणी यांना निवेदनातून लढा संघटनेचे संयोजक प्रवीण खानझोडे यांनी केली आहे. यावेळी सावर्ला गावातील लाभार्थी पांडुरंग आवगाण, श्रीराम चिव्हाने, कर्नू नैताम, शंकर बावणे, विकास चौधरी,  जंगलू नैताम, सुनीता ठमके, संतोष मडावी संजीवनी मुन, प्रताप मुन, उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेंडे, अजय धोबे, आशिष रिंगोले, विकेश पानघाटे उपस्थित होते. 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad