वणी :
हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वणी शहरातील सुप्रसिद्ध क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय येथे दि.१९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजुरकर, सचिव प्रा. विजय बोबडे, मा. दोडके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
वाचनालयाचे सचिव प्रा. विजय बोबडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक अरबी, उर्दु व फारसी भाषेतील शब्दांना पर्यायी शब्दांसाठी विद्ववान पंडितांची नियुक्ति करुन आपल्या भाषेचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही या परकीय सत्तांना नेस्तीनाबूत करुन स्वराज्य महाराष्ट्रात कसे निर्माण केले, याची संपूर्ण माहिती प्रा. बाळासाहेब राजूरकर यांनी अध्यक्षीय भाषणातून वाचकांना दिली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक संचालक अनिलकुमार टोंगे, सूत्रसंचालन सहसचिव गजेंद्र भोयर यांनी तर उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष अशोक चौधरी यांनी मानले. यावेळी वाचक आणि कर्मचारी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या