वणी :
रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी मराठा सेवा संघाच्या नेतृत्वात “छत्रपती महोत्सव” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा ३९५ वा जन्मोत्सव सोहळा शिवतीर्थावर साजरा होणार आहे.
या छत्रपती महोत्सवाचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार संजयभाऊ देरकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर हे असतील. या निमित्ताने ‘शिवकालीन कृषी नीती आणि वर्तमान कृषी धोरणे’ या विषयाच्या अनुषंगाने अर्थशास्त्र व कृषी विषयाचे अभ्यासक तथा संशोधक लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. करमसिंग राजपूत यांचे प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जय जगन्नाथ मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष संजयभाऊ खाडे, ग्रामपंचायत चिखलगाव येथील सरपंच रुपालीताई कातकडे, वणी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, क्रां. सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे सचिव प्रा.विजय बोबडे, नुसाबाई चोपणे विद्यालय वणीचे मुख्याध्यापक रविंद्र देवाळकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रवीण झाडे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष भारती राजपूत, संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष अजय धोबे, ज्ञानदा स्पर्धा परीक्षेचे संचालक वैभव ठाकरे, बार असोसिएशनचे माजी सचिव झाहिद शरीफ, धनोजे कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष मंगेश रासेकर, धनगर समाज संघटनेचे जिल्हा संघटक विलास शेरकी, लोहार संघटनेचे अध्यक्ष नितीन धाबेकर, आरोग्य कक्षाचे प्रमुख अरुण डवरे, युवा उद्योजक कक्षाचे प्रमुख नितेश ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमात मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे दि.12 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधून विवाहबद्ध झालेले शंकर आणि जान्हवी निब्रड या नवदाम्पत्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानवंत स्पर्धा परीक्षा २०२५ मधील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक ५०००, ३०००, २००० व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी, सदर महोत्सवात सर्व शिवप्रेमी वणीकर जनतेने सहभागी होण्याचे आवाहन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात येत आहे.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या