वणी :
नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून भारतीय जनता पक्षाने एकूण आघाडी कायम ठेवली आहे. मात्र तिसऱ्या फेरीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनीही यश मिळवत लढत अधिक चुरशीची बनवली आहे.
🔹 पहिली फेरी
पहिल्या फेरीत सहा जागांसाठी मतमोजणी झाली.
प्रभाग क्रमांक 1 :
प्रणाली गणेश देऊळकर, अजय पांडुरंग धोबे (शिवसेना उबाठा)
प्रभाग क्रमांक 2 :
रिता महेश पहापळे (भाजप), धनराज रमेशराव भोंगळे (अपक्ष)
प्रभाग क्रमांक 3 :
वैशाली विनोद वातीले, लक्ष्मण महादेव उरकुडे (दोन्ही भाजप)
पहिली फेरी – निकाल :
भाजप – 3 | शिवसेना उबाठा – 2 | अपक्ष – 1
🔹 दुसरी फेरी
दुसऱ्या फेरीत भाजपने आपले वर्चस्व अधिक मजबूत केले.
प्रभाग क्रमांक 4 :
स्नेहा खैरे, राकेश लक्ष्मण बुगेवार (भाजप)
प्रभाग क्रमांक 5 :
सोनाली निमकर, रितिक मामीडवार (भाजप)
प्रभाग क्रमांक 6 :
करुणा कांबळे (काँग्रेस), अनिकेत बदखल (शिवसेना उबाठा)
दुसरी फेरी – निकाल :
भाजप – 4 | शिवसेना उबाठा – 1 | काँग्रेस – 1
🔹 तिसरी फेरी
तिसऱ्या फेरीत विविध पक्षांना यश मिळाल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली.
प्रभाग क्रमांक 7 :
नितीन धाबेकर, उषा डुकरे (दोन्ही भाजप)
प्रभाग क्रमांक 8 :
प्रमिला चौधरी (भाजप), सुधीर थेरे (शिवसेना उबाठा)
प्रभाग क्रमांक 9 :
अब्दुल हफीज उर्फ टापू (अपक्ष), किरण देरकर (शिवसेना उबाठा)
तिसरी फेरी – निकाल :
भाजप – 3 | शिवसेना उबाठा – 2 | अपक्ष – 1
🔹 अध्यक्षपदावर भाजप आघाडीवर
प्रभाग क्रमांक 1 ते 9 साठीच्या अध्यक्षपदाच्या मतमोजणीत भाजप 2000 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती असून नगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या दिशेने भाजप एक पाऊल पुढे असल्याचे चित्र आहे.
🔹 एकूण चित्र
तिन्ही फेऱ्यांतील निकाल पाहता भाजपने एकूण आघाडी राखली असली, तरी शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि अपक्षांनीही ठिकठिकाणी प्रभावी कामगिरी केली आहे. पुढील मतमोजणी फेऱ्या व सत्तास्थापनेची गणिते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या