वणी :
नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीतील चौथ्या फेरीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखत सहापैकी सहा जागांवर विजय मिळवला. या फेरीत भाजपने एकही जागा न गमावता आपली आघाडी अधिक मजबूत केली आहे.
चौथ्या फेरीतील निकाल पुढीलप्रमाणे –
प्रभाग क्रमांक १० :
आरती वांढरे – भाजपा
अनिल चिंडालिया – भाजपा
प्रभाग क्रमांक ११ :
रेखा कोवे – भाजपा
लवली लाल – भाजपा
प्रभाग क्रमांक १२ :
पूजा रामगिरवार – भाजपा
मनोज सिडाम – भाजपा
या फेरीत भाजपने सर्व जागांवर विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.
📌 आतापर्यंतचा निकाल:
भाजपा – १६
उबाठा – ५
काँग्रेस – १
अपक्ष – २
दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवार ३००० पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे नगरपालिकेवर भाजपची सत्ता स्थापन होण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत.
चौथ्या फेरीतील निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शहरात विजयाचे जल्लोष सुरू झाले आहेत. विरोधकांसाठी मात्र हे निकाल धक्कादायक ठरले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या