वणी :
येथील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत व शिवगर्जना सादर केल्या नंतर साईराज वैद्य व आरोही कळसकर या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज व माॅ जीजाऊं च्या वेशभूषेत मनोगत व्यक्त केले.
तसेच वृषाली मडावी, स्वरा उईके, स्वरांगी शिंदे, नैतिक ढुमणे, साकेत शास्त्रकार, आराध्य गोहोकार, तन्मय पींपळकर या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर उत्स्फूर्त भाषणे दिली तर देवांशू राऊत व अभीर सरमोकदम यांनी महाराजांचा पोवाडा व नृत्य, ओजस मार्कंडे याने शिवाजी चालीसा सादर केला व आस्था ईलमे व स्वरा कोंगरे यांनी शिवकालीन नृत्य व अभिनयाद्वारे नारीशक्ती चे महत्त्व सांगितले पालक सौ. भाग्यश्री वैद्य यांनीही मनोगत व्यक्त केले.
शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर व माजी प्राचार्य प्रशांत गोडे व जेष्ठ शिक्षक रविंद्रनाथ लिचोडे, पर्यवेक्षिका संध्या बेडदेवार, मनीषा कापसे हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनांतील प्रसंग सांगून मागदर्शन केले.
वर्गशिक्षिका प्रीती निकुरे याचे मार्गदर्शनाखाली वेदिका खोके व संजीता हापसे यांनी संचालन केले तर आर्या चिडले हिने आभार मानले राष्ट्रगीताने शिवजन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली या वेळी विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या