प्रतिनिधी/कोरा (मंगेश राऊत) :
आज दि.15 /08/2024 रोजी 78 वा स्वातंत्र दिनानिमित्त प्रा .आ. केंद्र, कोरा येथे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर मुरतकर यांच्या मनातील संकल्पनेतुन "स्वातंत्रदिन महोत्सव ध्वजारोहणाचा मान कर्मचाऱ्यांना" या कार्यक्रमा अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या कामाच्या गुणांनुसार प्रा. आ. केंद्र, कोरा चे परिचर श्री राजु गौतम शंभरकर यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. या सुवर्णक्षणी त्यांच्या परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. प्रा.आ. केंद्रातील ध्यजारोहन हे परिसरातील आगळे वेगळे ध्वजारोहण ठरले. तसेच प्रा.आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर मुरतकर, डॉ. मुकुल मावळे, सर्व कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या