वणी/प्रतिनिधी :
७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्य १५ ऑगस्ट रोजी वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. गणेश किंद्रे साहेब यांना भारताचे संविधान उद्येशिका भेट देऊन द ग्रेट पिपल्स ग्रुप वणी तर्फे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
१५ ऑगस्ट २०२४ रोजी, स्वातंत्र्यदिनी संविधान जनजागृतीचा, राष्ट्रप्रेम संदेश दिला. या संदेशाने प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम निर्मितीचा पाया रुजूवून प्रत्येकाच्या मनामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी संविधानचे प्रसार सुरु.
यावेळी शांती सैनिक विनोद गोन्लावार, डॉ. अतिक सय्यद, दत्ता डोहे, दिनेश रायपूरे यांच्या हस्ते उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांना भारताचे संविधान उद्येशिका भेट देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या