Type Here to Get Search Results !

प्रा.श्याम मानव यांचे व्याख्यान

वणी :           

       प्रख्यात सामाजिक व राजकीय अभ्यासक, विचारवंत तसेच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3 वाजता शेतकरी मंदिर वणी येथे हे व्याख्यान संपन्न होईल. "लोकशाही वाचवण्यासाठी संविधानाची गरज" या विषयावर प्रा. शाम मानव संबोधन करतील.

                    वणी परिसरातील पुरोगामी आणि परिवर्तनवादी विचारसरणी असलेल्या विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वणीचे अध्यक्ष एडवोकेट देविदास काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक दशरथ मडावी यवतमाळ यांची विशेष उपस्थिती असेल. माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.टिकाराम कोंगरे, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे संचालक संजय खाडे, वसंत जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी वणी चे अध्यक्ष आशिष खुळसंगे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वणी विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत खाडे, भारतीय या आणि डॉक्टर असोसिएशन वणी चे अध्यक्ष डॉ. रमेश सपाट यांची प्रमुख उपस्थिती याप्रसंगी असेल.

            सामाजिक अंधश्रद्धा याविरोधात गेली अनेक वर्षे प्रा. शाम मानव यांनी महाराष्ट्र ढवळून काढला होता. आता त्यांनी थेट राजकीय भूमिका घेतल्यामुळे या व्याख्यानाकडे अनेक लोक उत्सुकतेने बघत आहे. या व्याख्यानाच्या माध्यमातून राजकीय अंधश्रद्धा दूर करण्याचे महत्त्वाचे कार्य होऊ शकते, अशी अपेक्षा आयोजकांची आहे. म्हणून लोकशाहीवर विश्वास असलेल्या सुजाण नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा.असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,शेतकरी संघटना, विदर्भ जन आंदोलन समिती आणि सेवानिवृत्त समिती यांचे वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad