Type Here to Get Search Results !

हर मन संविधान , हर घर संविधान हे अभियान शाळा / महाविद्यालयीन स्तरावर राबवा

 

प्रतिनिधि/वर्धा(मंगेश राऊत) : 

                    भारतामध्ये धर्म ,जात , पंथ , लिंग , भाषा , भौगोलिक स्थिती ई बाबतीत कमालीची विविधता असताना देखील गेल्या ७५ वर्षात भारत एकसंघ आहे याचे कारण भारतीय संविधान आहे . समता ,स्वात्तंत्र्य , न्याय ,बंधुता या बुद्ध तत्त्वज्ञानातील मूल्यांच्या आधारे स्त्रियांसह सर्व घटकांना एका मानवतेच्या धाग्यात गुंफण्याच काम संविधानाच्या माध्यमातून होत आहे . अशा या आदर्शवत लिखित संविधानाच्या अंमलबजावणीला येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहे . भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित संविधानाबद्दलंची जाणीव जागृती राज्यातील तसेच देशातील शाळा / महाविद्यालय स्तरावर होणे गरजेचे आहे . त्यासाठी भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने “ *हर मन संविधान , हर घर संविधान “* हे अभियान देश , राज्य पातळीवर शाळा / महाविद्यालयीन स्तरावर राबवावे अशी विनंती  प्रधानमंत्री भारत सरकार , मुख्यमंत्री ,  उपमुखमंत्री ,  सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र शासन यांना  जिल्हाधिकारी वर्धा यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

        स्थानिक अश्वघोष सांस्कृतिक मंच तर्फे सोमवार दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी  नरेंद्र फुलझेले  यांना देण्यात आले . या निवेदनात अश्वघोष सांस्कृतिक मंच वर्धा जिल्हा व शहर पातळीवर मासिक व्याखाने , संविधान कार्यशाळा ,संविधान परीक्षा ई उपक्रम राबवित आहे हे नमूद करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित शासनाने जे “ हर घर तिरंगा “ हे अभियान राबविले त्याच धर्तीवर “ हर मन संविधान , हर घर संविधान “ असे अभियान राबविले  तरच विद्यार्थ्यांची वाटचाल पुढील काळात संविधानिक मूल्यांच्या आधारे होईल असा आशावाद या निवेदनातून व्यक्त केला आहे .यावेळी अश्वघोषचे कार्यकर्ते प्रकाश कांबळे , माजी मुख्याध्यापक प्रभाकर भगत, शाक्य संघाचे अध्यक्ष प्रविण कांबळे , बामासेफ चे कार्यकर्ते सिद्धार्थ नगराळे, बुद्ध टेकडीचे कार्यकर्ते सुनील ढाले , दिनेश वाणी , प्रणोज बनकर ,राजेश कोल्हे ,प्रविण जंगले ,प्रजासत्ताक चे मनोहर लांडगे , किशोर ढाले ,पथदर्शक चे जगदीश भगत , महाराष्ट्र अनिसचे निखिल सुशीला मोरेश्वर , तनु वराडे ई कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad