वणी, शुभम कडू :
शहरातील मुख्य असेलाला रस्ता. भरगच्च वाहतूक. अनेक शैक्षणिक संस्था याच रोडवर. अशा या रोडला अनेक खड्डे. जीवघेणे खड्डे. मात्र प्रशासनातील कोणाचेही लक्ष इकडे नाही. हे लक्ष वेधून घेण्यासाठी आज दि. ०५ ऑगस्ट ला संभाजी ब्रिगेडच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले. पुढील सात दिवसात या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम न केल्यास स्थानिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अजय धोबे व सहकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या