तरोडा येथील शेकडो लोकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. शनिवारी दुपारी खा. प्रतिभा धानोरकर यांच्या वणी येथील घरी हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. भाजपने सर्वसामान्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले. शेतक-यांच्या समस्या सुटण्याऐवजी उलट वाढत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया यावेळी तरोडा येथील पक्ष प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांनी दिली.
खा. प्रतिभा धानोरकर यांनी तरोडा येथील सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. काँग्रेस हाच सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकतो. सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो. हा विश्वास दृढ होत आहे. त्यामुळे लोकांचा काँग्रेसकडे ओढा वाढत आहे, असे मनोगत यावेळी खा. प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.
पक्ष संघटना मजबुतीवर भर - संजय खाडे
खा. प्रतिभा धानोरकर यांच्या विजयामुळे पक्षाला नवी उभारी मिळाली आहे. लोक प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश करीत आहे. सध्या पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर असून पक्ष गावागावात पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. येत्या काळात आणखी गावातील लोक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
- संजय खाडे, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस
यावेळी देविदास काळे, पुरुषोत्तम आवारी, प्रा. शंकर व-हाटे, तेजराज बोढे, अनिल देरकर, प्रमोद वासेकर, टिकाराम कोंगरे, उत्तमराव गेडाम, जयसिंग गोहोकार, संध्या बोबडे, अनिल भोयर, मडावी, नंदेश्वर आसुटकर, रवि कोटावार यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या