प्रतिनिधि/कोरा (मंगेश राऊत) :
सरस्वती ग्रामीण शिक्षण संस्था बोडखा पाई द्वारा संचालित सरस्वती विद्यालय धोंडगाव येथे गुरुवारला साहित्यरत्न. अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल देवढे व प्रमुख अतिथी संदेश निखाडे होते. कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमा निमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.
यात वर्ग नववीचा विद्यार्थी आदर्श बुरचुंडे, वर्ग आठवीची विद्यार्थिनी कुमारी काजल मोडी, व वर्ग नववीची विद्यार्थिनी कुमारी अश्विनी बोंडे यांनी भाग घेत भाषनातून या दोन्ही महामानवाबद्दल आदरांजली व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष देवढे यांनी गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ येथील अग्रगण्य कवी विचारवंत साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचा जीवन परिचय व त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या वारणेचा वाघ,चित्रा, अलगुज, इत्यादी विषयी माहिती देत असताना त्यांचे चिरा नगर मध्ये दिले वास्तव्य ते रशियामध्ये त्यांनी मिळवलेली लोकप्रियता इथपर्यंतचा इतिहास उलघडून दाखवला रशिया सारख्या देशात अण्णाभाऊ साठे यांची असलेली लोकप्रियता त्यांच्या कादंबऱ्यांचे झालेले अनुवाद आणि यातून मिळवलेली संपत्ती मात्र त्या संपत्तीचा वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही अण्णाभाऊ साठे यांनी वापर केला नाही.यातून विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही किती श्रीमंत आहात यापेक्षा तुमच्याकडे किती आत्मशक्ती आहे हे महत्त्वाचे आहे आणि त्यातूनच आपलं जीवन घडत जाते आपली आर्थिक परिस्थिती कमजोर असली म्हणजे आपण जीवनात काही करू शकत नाही असा न्युनगंड न बाळगता अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र अभ्यासले तर तुमच्या हे लक्षात येईल की महान माणूस बनण्यासाठी पैशाची गरज नसते अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले साहित्य इतके आघात होते की त्यांना साहित्यरत्न म्हणून पदवी दिल्या गेली.अशा या महान माणसाचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा.
तसेच लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती देत असताना " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे सांगणारे लोकमान्य टिळक यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात परीक्षेला समोर जाण्यासाठी कितीतरी अंतर नदी पोहून पार केले होते.त्यांच्या या जिद्दीतून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की शिक्षण घेण्यासाठी कितीही अडथळे निर्माण झाले तरीही त्याच्यावर मात करून ते मिळवलेच पाहिजे.स्वातंत्र्यसंग्रामातील एक जहाल व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक होत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मोहिनी भोसकर हिने केले तर आभार कुमारी वैष्णवी बचाटे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे कौतुक संस्थेचे पदाधिकारी यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या