झरी/प्रतिनिधी :
तालुक्यातील निमणी गावातील नागरिकांना महिन्याला राशन मिळत नाही. तसेच कधी कधी एक-एक महिना चुकवून त्यांना राशन दिला जातो. त्यामुळे निमणी गावातील नागरिकांचे खूप हाल होत आहे. राशन डीलरला वारंवार सूचना देऊन देखील राशन पुरवठा नियमित होत नाही. अशी तक्रार नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडे करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते मा. राजुभाऊ उबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे सैनिक रवि कुमरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. येत्या ८ दिवसात यातून योग्य मार्ग काढावा, राशन विक्रेता विरोधात कार्यवाही करावी. अन्यथा मनसे व सर्व नागरिकांतर्फे आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार साहेब यांना देण्यात आला.
यावेळी समिर मरापे, सौरव कन्नाके, ओम कन्नाके, अवि रामपुरे, साधु चौधरी, महेन्द्र पेंदोर, आकाश कुमरे, महेश आत्राम, सुरज मडावी, करण आत्राम, प्रेम टेकाम, माईवन टेकाम, आशिष कुडमेथे, श्रावण टेकाम, रमेश आत्राम, अनिस आडे, लेंतु टेकाम, शंकर आत्राम आणि ग्रामस्थ, मनसे सैनिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या