समुद्रपुर/प्रतिनिधी (मंगेश राऊत) :
कोरा--पिंपळगाव येथे ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. टेमचंद वरभे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत आय. सी. टी .सी .विभाग व नोबल शिक्षण संस्था वर्धा अंतर्गत लिंक वर्कर प्रकल्प तर्फे HIV एड्स तपासणी,कावीळ,एन सी डी तपासणी मोफत करण्यात आली व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना एच आय व्ही/ एड्स व कावीळ या आजारावर प्रयोग शाळा तंत्रज्ञ मृणालिनी चव्हाण मॅडम व माधुरी भोयर यांनी मार्गदर्शन केले. पिंपळगाव येथील सी.एच.ओ.चेतन आडे सरांनी तपासणी केली कोरा येथील आरोग्य सहाय्यक जी.एम.आडे सर आरोग्य सेविका भारती मून मॅडम उपस्थित होत्या तसेच गावातील आशा ताई सीमाताई भानखेडे व रुपालिताई सातक यांनी सहकार्य केले.तसेच लिंक वर्कर अतुल लांबट यांनी आभार प्रदर्शन करून आय .ई सी. चा वाटप करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या