Type Here to Get Search Results !

कनकवाडी येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ

वणी : 

          मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास कनकवाडी येथे विद्या सुधाकर हिवरकर (वय ४७) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. विद्या या मनसेच्या शहर संघटिका असून, लेडीज गारमेंट आणि ज्वेलरीचा यशस्वी घरगुती व्यवसाय करत होत्या. त्यांचा परिसरात आणि राजकीय क्षेत्रात दांडगा संपर्क होता. सुस्वभावी आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्या सर्वांना परिचित होत्या. 

            विद्या यांचे पती सुधाकर हे गुप्ता मशनरीज दुकानात काम करतात, तर मुलगी दिल्लीत नोकरीला आणि मुलगा नागपूर येथील सैनिक स्कूलमधून उच्च शिक्षित आहे. सुखी सांसारिक जीवन असताना त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सकाळी पतींशी व्यवस्थित संवाद झाल्यानंतर दुपारी त्या फोन उचलत नसल्याने मैत्रिणीने घरी जाऊन पाहिले असता त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. 

              या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad