Type Here to Get Search Results !

नगर वाचनालयातील ग्रंथ संपदेमुळे युवकांच्या जीवनाला कलाटणी – विजय चोरडिया

वणी : 

        नगर वाचनालयात कादंबरी, चरित्र, कथा, ऐतिहासिक पुस्तकांसोबत स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे मोठा साठा आहे. या स्पर्धेच्या युगात जीवनाला घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षा ही एक प्रभावी माध्यम आहे. या वाचनालयात असलेल्या प्रचंड ग्रंथ संपदेमुळे  युवकांच्या जीवनाला निश्चितच कलाटनी मिळेल असा विश्वास दानशूर सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे नेते विजय चोरडिया यांनी व्यक्त  केला. ते नगर वाचनालयात आयोजित स्पर्धा परीक्षा ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी अतिथी म्हणून मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजुभाऊ धावंजेवार उपस्थित होते. 

     दिनांक 4 सप्टेंबरला सायंकाळी फीत कापून ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन केल्यानंतर ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला हरार्पन  केल्यानंतर चोरडिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. 

         उद्घाटक म्हणून बोलतांना चोरडिया यांनी नगर वाचनालय वाचन संस्कृती टिकविण्यासाठी सातत्याने करीत असलेल्या प्रयत्नाची मुक्त कंठाने प्रशंसा करून वाचनालयात येणाऱ्या वाचकांसाठी शुद्ध पाण्याचे सयंत्र देण्याची घोषणा केली. प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना धावंजेवार यांनी वाचनालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करून या वाचनालयात अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन सहायक ग्रंथपाल प्रमोद लोणारे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad