वर्धा/प्रतिनिधी( मंगेश राऊत ) :
शहरात दि. २६ मार्च २०२४ ला जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी मा.डॉ. सचिन तडस सर, विशेष अतिथी- (DHO) डॉ. पराडकर सर,डॉ. राजेश सरोदे, डॉ. चारुलता सूर्यवंशी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हेमंत पाटील सर (DTO) यांनी केले. संचालन साधना कोसरे यांनी केले तसेच डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा. येथील एम एस डब्ल्यू 4th semester चे विद्यार्थि वैद्यकीय व मानसोपचार सेवा क्षेत्र विशेषकरणांतर्गत क्षयरोग दिनानिमित्त पथनाट्य सादर करण्यात आले. अंकिता मगरदे,पायल गुजरकर,मोहित कांबळे, पायल डाहारे, निकिता लोखंडे ,प्रांजली थुल, काजल मोरे ,प्रतिक्षा घवघवे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. डॉ.सुमंत ढोबळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या