विश्वाची निर्मिती सहा अब्ज वर्षापूर्वी झाली आणि पॄथ्वीची निर्मिती चारशे साठ कोटी वर्षापूर्वी झाली . त्यानंतर उत्क्रांतीहोत होत साडेतीन कोटी वर्षापूर्वी माणूस तयार झाला तोपर्यंत देव ही संकल्पना अस्तित्वात नव्हती . पुढे पुढे माणूस आकाशाचे , सूर्याचे निरीक्षण करीत गेला आणि अवतिभोवती घडणाऱ्या घटना कुठल्यातरी शक्तीमुळे घडतात यातून “ देव “ या संकल्पनेचा शिरकाव माणसाच्या आयुष्यात झाला .जगाच्या पाठीवर देव आहे ? देव नाही आहे अशा देव मानणारे आणि न मानणाऱ्यांच्या सात तऱ्हा दिसून येऊ लागल्या .महाराष्ट्र अनिसच्या देव मानणे किवा नं मानणे याला कुठलाही आक्षेप नाही अनिसची देवाबद्दलची भूमिका अतिशय तटस्थ आणि विवेकी आहे . पण देवाच्या , धर्माच्या नावाने जर माणसाचे शोषण होत असेल तर तेथे अनिसची भूमिका सुरू होते असे प्रतिपादन महाराष्ट्र अनिसचे राज्य सरचिटणीस मा . विनायक सावळे शहादा ( नंदुरबार ) यांनी केले.
स्थानिक महाराष्ट्र अंधश्रधा निर्मूलन समिती तर्फे शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृतिप्रीत्यर्थ सोमवार दिनांक २५ मार्च २०२४ रोजी साय. सात वाजता १५७ वा अभ्यास वर्ग वरदा वर्धन हॉट येथील सभागृहात तालुकाध्यक्ष अरुणभाऊ चवडे यांचे अध्यक्षतेखाली व महिला विभागाच्या द्वारकाताई ईमडवार ,राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते .
“देव , धर्म , नीती , अनिसची भूमिका आणि भारतीय संविधान “ या विषयावर बोलताना त्यानी प्रारंभी दोन पिढीतील देवाबद्दलची संकल्पना समजावून सांगितली . त्यानंतर विश्वाच्या निर्मितीचा इतिहास ब्लैक बोर्ड वर विविध उदा देत विनोदी शैलीने समजावून सांगत प्रसिद्ध साहित्यिक बाबूराव बागुल यांच्या “ वेदाआधी तू होतास …” ही कविता सांगत देव संकल्पना विशद केली तसेच अनिसला संत गाडगेबाबा यांची माणसात देव शोधण्याची परंपरा मान्य असल्याचेही सांगितले .त्यानंतर वैदिक आणि अवैदिक परंपरा सांगत देव आणि धर्माच्या नावाने शोषणाची मोठी जाळी कशी तयार होते हेही सांगितले . त्यांनतर धर्म बद्दल माहिती देताना धर्मातील कर्मकांड ,मिथ्या कथन ,शोषण आणि मुल्ये यावरही त्यानी माहिती देत धर्माच्या नावाने शोषण होत असेल तर त्याचीही चिकित्सा झाली पाहिजे अशी अनिसची भूमिका असल्याचे त्यानी सांगत भारतीय संविधानाने दिलेले स्वातंत्र्य हेच संविधानाच सौंदर्य आहे आणि त्यानुसार अनिस कार्य करते असेही ते म्हणाले.
या अभ्यास वर्गाचे सूत्रसंचालन प्रा प्रीतेश म्हैसकर, प्रास्ताविक प्रकाश कांबळे , परिचय निखिल सुशीला मोरेश्वर तर आभार डॉ मंजुषा देशमुख यांनी केले .
यावेळी होळीचा पाडवा असूनही मोठ्या संखेने श्रोते उपस्थित होते . आयोजनासाठी सारिका देहनकर,अरुण भोसले , सुनील ढाले , डॉ माधुरी झाडे , डॉ हरीश पेठकर ,शंकर श्रीरामे ,रूपेश वैध ,रजनी सुरकार , कविता लोहट ,समीक्षा गाडगे ई. सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या