वणी, शुभम कडू :
पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या निबंध स्पर्धेचा विषय जल जीवन मिशन हा असून या स्पर्धेत माध्यमिक गटात अवंतिका प्रमोद लोणारे यांचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आला. अवंतिका ही स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात इयत्ता नववी वर्गात शिकत आहे. यवतमाळ येथे हा पारितोषिक गौरव वितरण सोहळा झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते तिला पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात आले. माजी नगरसेवक प्रमोद लोणारे यांची ती मुलगी असून अवंतिका ही आपल्या यशाचं श्रेय तिचे पालक, प्राचार्य क्षीरसागर सर आणि शिक्षक वृंदांना देते. अवंतिका च्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या