Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खापरी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक

समुद्रपुर/प्रतिनिधी (मंगेश राऊत):-

                                               कोरा-वर्धा जिल्ह्याच्या सीमेच्या टोकावर असलेले कोरा परिसरातील खापरी गाव व तेथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ही नावापुरतीच होती. खापरी गावची मुले शाळेला रामराम ठोकून आजूबाजूच्या गावाला शिक्षण घ्यायला जायला सुरुवात झाली. परंतु शाळेबाबत काही वेगळेच घडायचे होते आणि अचानक एक दांपत्य नव्याने शाळेला शिक्षकांच्या रुपी मिळाले आणि इथूनच शाळेची परिस्थिती बदलायला सुरुवात झाली.

     शाळेत न येणारी मुले,शाळाबाह्य असणारी मुले शाळेत यायला लागली. शाळेत सुंदर आनंददायी वातावरण निर्माण झाले. मुलांना शाळेची ओढ वाढू लागली व अवघ्या काही दिवसातच शाळेला नवचैतन्य आले. शाळेतील मुख्याध्यापक पुरुषोत्तम बावणे व शिक्षिका सुजाता बावणे, शिक्षक कपिल खेकारे यांनी पालकांना सोयीने होईल अशी पालक सभा घेतली. सायंकाळच्या पालक सभेला अंदाजे ६०० पालक व ग्रामवासी उपस्थित होते. या पालक सभेतून "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" उपक्रमाची स्वप्न साकारला सुरुवात झाली व अनेक पालकांनी व ग्रामवासियांनी निधी गोळा करून सक्षम शाळा करण्यास सुरुवात केली. 

  विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट करण्यात आली शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणारे वृक्षांची रोपण व संगोपणास सुरुवात झाली. शाळेचे इमारतीची व संरक्षण भिंतीची रंगरंगोटी करण्यात आली. प्रबोधनात्मक सुविचार, चित्र इत्यादी द्वारे बोलक्या भिंती ची उभारणी करण्यात आली, विद्यार्थी मंत्रिमंडळाची उभारणी करण्यात आली पळस, बागेची निर्मिती करण्यात आली, 'मेरी माटी मेरा देश' सारखे उपक्रम राबविण्यात आले, शाळेतील आपलातून बचत बँक, पैशाचा योग्य विनियोग व व्यवस्थापन यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्वाचा विकासासाठी आवश्यक अवांतर वाचन, वकृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा, संगीत स्पर्धा, कला स्पर्धांचे आयोजन व विद्यार्थ्यांचा सहभाग, एनसीसी, स्काऊट गाईड, एमसीसी उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे उपक्रम, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, प्रथमोपचार पेटीची उपलब्धता व वापर , आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास रचनावर रोजगार व्यवसाय व्यापार उद्योग अशा क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी विविध कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन जज साहेब, डॉक्टर, व्यापारी, व्यवसायिक यांचे मार्गदर्शन व व्याख्याने आयोजित करण्यात आले. तंबाखू मुक्त शाळा, प्लास्टिक मुक्त शाळा, माजी विद्यार्थी  गौरव मेळावा, डिजिटल शाळांना भेटी इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.

  भौतिक सुविधा तसेच अध्यापन व अध्यायनाशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कार्पोरेट कंपन्या, संस्थेची संस्था दानशूर व्यक्ती इत्यादी घटकांकडून वस्तू व सेवा स्वरूपात अधिकाधिक देणगी गोळा करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जमनालाल बजाज फाऊंडेशन वर्धा यांच्या कडून दहा संगणक व एक स्मार्ट बोर्ड 30% शाळेचा सहभाग व 70 टक्के बजाज फाउंडेशन चा सहभाग व आमदार समीर कुणावर यांच्याकडून चार लाख रुपयाचे टॅबलेट स्थानिक निधीतून देण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच देविदास दोडके, उपसरपंच मिथुन पोंगळे,ग्रामसेवक भोमले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रुपेश भाऊ गाऊत्रे,पोलीस पाटील जीवतोडे, तंटामुक्ती अध्यक्ष डंबारे, व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिकेत चौधरी,ईश्वर धारणे तथा समस्त शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जिल्हा परिषदचे माजी सदस्य रोशन भाऊ चौखे,केंद्रप्रमुख विनोद पालवे, गटशिक्षणाधिकारी अशोक गीद्देवार या सर्वांच्या अनमोल  मार्गदर्शनातून शाळेला हे शुभ दिवस पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात समुद्रपूर तालुक्यात प्रथम क्रमांक व वर्धा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला समस्त ग्रामवासिनी ग्रामपंचायत सरपंच सदस्यांनी  जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळाल्यामुळे शिक्षकांचे व शिक्षण विभागाचे आभार मानले.

        आठ महिन्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खापरीचा पूर्ण चेहरा मोहरा बदललेला आहे जर गावकऱ्यांनी व शिक्षकांनी मनावर घेतले तर जिल्हा परिषद खापरी शाळा सारख्या इतर शाळाही सुंदर व्हायला वेळ लागणार नाही व जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन संपूर्ण समाजाचा बदलून जाईल म्हणतात ना गावकरी ते रावण करी हे प्रत्यक्षात उतरेल.

   जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खापरी जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळणे याचे श्रेय शाळेतील शिक्षकांना ,विद्यार्थ्यांना ,पालकांना व ग्रामवशीयांना जाते.

            श्री पालवे

          केंद्र प्रमुख कोरा


   "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या उपक्रमात सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी,पालकांनी,  ग्रामवशीयांनी, कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. त्यामुळे यश मिळेल यापुढेही सुंदर शाळा बनविण्यासाठी असेच प्रयत्न सुरू राहील.

                 श्री.पुरुषोत्तम बावणे

                    मुख्याध्यापक,

         जि.प.उ.प्रा.शाळा खापरी

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad