Type Here to Get Search Results !

वणीत पार पडला, डोळ्यांची पारणे फेडणारा शिवजयंती सोहळा


वणी, शुभम कडू : 

                          ताशांचा गजर, नृत्य, झांजांचा निनाद, आकर्षक देखावा आणि लेझीम पथकाच्या दणदणीत सलामीत आणि आचारसंहितेच्या नियमांचे पालन करून वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी झाली. दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे राजू उंबरकर यांच्या माध्यमातून वणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. यामध्ये तुळजा भवानी मातेचा भव्य दिव्य देखावा, शिवरायांचा महाअभिषेक, ढोल ताशा पथकाचे वादन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या जयंती सोहळ्यानिमित्त वणी परिसर भगवामय होऊन 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषात दणाणून गेला. शिवजयंतीनिमित्त चौकाचौकात भगव्या कमानी, झेंडे आणि शिवाजी महाराजांचे वर्णन करणाऱ्या पोवाड्यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.

वणीत पारंपरिक प्रथेनुसार शिवजयंती उत्सवाचा प्रारंभ महाअभिषेक करून करण्यात आला. त्यानंतर याठिकाणी अनेक शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी मात्र ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसरात अतिशय उत्साहाचे वातावरण झाले होते. पारंपरिक वेशभूषा परिधान करून आलेले बाल शिवाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्याचबरोबर ढोल ताशांचा गजर, नृत्य, शिवरायांचा जयघोष यामुळे शिवजयंती सोहळ्याचा दिमाख अधिकच वाढला.  

                 "मनसेच्या वतीने छत्रपती शिवरायांची जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यामध्ये तुळजा भवानी मातेचा आकर्षक आणि भव्य दिव्य देखावा उभारण्यात आला होता. शिवजयंती साजरी करण्याबरोबरच शिवरायांचे विचार जोपासणेही सर्वांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिवरायांनी दिलेल्या विचारांवर वाटचाल करत आहोत आणि यापुढेही करत राहू."

                    - राजु उंबरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

📢 ताज्या बातम्यांसाठी
🟢 WhatsApp वर Join करा

Below Post Ad