Type Here to Get Search Results !

कोसारा येथे वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान, आमदारांनी दिले तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

मारेगाव/प्रतिनिधी :
                         तालुक्यातील कोसारा येथे दि. ३० मार्च २०२४ ला संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडला. या वादळी वाऱ्यामध्ये प्रचंड नुकसान झाले. यामध्ये बऱ्याच ठिकाणी झाडे कोसळली, विद्युत तारा तुटल्या. तसेच गावातील घरांचे ही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घरावरील टीन पत्रे वादळामुळे उडाली, संसार उपयोगी सामान उघड्यावर आले. यामुळे गावकरी हवालदिलं झाले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आज दिनांक ३१ मार्चला कोसारा या गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पटवारी व कोतवाल यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad