Type Here to Get Search Results !

आर्या इंटरनॅशनल स्कुल, मुकुटबन येथील विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षेत भरारी

झरीजामनी : तालुक्यातील ज्ञानदा बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था मुकूटबन द्वारा संचालित आर्या इंटरनॅशनल स्कुल, मुकूटबन येथील तब्बल तीन विद्यार्थी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होऊन यशाला गवसणी घालत शाळेची दरवर्षी प्रमाणे नवोदय करिता निवड चालू असलेली परंपरा कायम ठेवण्यात यश प्राप्त झाले.
             जवाहर नवोदय समिती मार्फत दि. २० जानेवारी २०२४ ला आयोजित प्रवेश परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये आराध्या मुकेश जयस्वाल, आर्यन प्रफुल मुद्दमवार, नियती गणेश सिडाम या तीनही विद्यार्थ्यांनि दैदिप्यमान यश संपादन करून आपला प्रवेश निश्चित केला.संस्थेच्या सर्व संचालकांनी, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad