कोरा-- पी एच सी अंतर्गत दसोडा येथील सौ. लक्ष्मी उमेश बंडे यांना प्रसूतीच्या वेदना व्हायला लागल्यात्यामुळे १०२ वर फोन करून रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले. दसोड्या वरून लक्ष्मी ला घेवून रुग्णवाहिका निघाली असता मंगरूळ परिसरातच रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती झाली. त्यामुळे रुग्णवाहिका चालक नरेश शंभरकर यानी कोरा पी. एच. सी तील डॉक्टर यांच्याशी संपर्क साधून कोऱ्याला लक्ष्मीला घेवून आले. परंतु प्रसूतीमध्ये लक्ष्मीला दोन जुळी बालके झाली व पूर्ण नऊ महीणे न झाल्यामुळे आणि गर्भावरणाच्या पिशवी सोबत बाहेर आल्यामुळे प्रसूती कठीण होती. परंतु डॉ. समीर मुरतकर व डॉ. मुकुल मावळे यांनी गर्भावरणाच्या पिशवीतून बाळाला बाहेर काढले असता एक बाळ काहीच हालचाल करत नव्हते, रडत ही नव्हते व निळे पडले होते त्यामुळे त्याला कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आले, तोंडाने स्वास देण्यात आला, अनेक प्रयत्न केल्या नंतर एक तासाने त्या बालकाने स्वास घेतला व डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले.कोरा पी एच सी ला डॉक्टर मुरतकर बालरोग तज्ञ मिळाल्यामुळे त्याचा फायदा लक्ष्मीच्या नवजात बाळांना झाला.
गर्भावरणाच्या पिशवीसोबत जन्माला येणारी बालके ही 80 हजार जन्मलेल्या बालकांमध्ये एक बालक असते अशी दुर्मिळ घटना कोरा परिसरात दसोडा गावातील लक्ष्मी उमेश बंडे यांच्या रुपी घडून आली व अशी बालके नशीबवान असतात असे म्हटले जाते.जुळी बालके ही कालावधीच्या आधी जन्माला आल्यामुळे त्यांचे वजन कमी 1700 ग्रॅम होते. त्यामुळे त्यांच्या पुढील उपचाराकरिता सेवाग्राम येथे हलविण्यात आले. डॉक्टर समीर मुरतकर इनचार्ज वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर मुकुळ मावळे वैद्यकीय अधिकारी, चेतन आडे सामुदायिक आरोग्य अधिकारी, नरेश शंभरकर, जयश्री ढोबे,कापटे सिस्टर, कुणाल मेश्राम, योगिता शंभरकर सर्व पी एच सी च्या कर्मचाऱ्यांनी प्रसुतीसाठी परिश्रम घेतली.
"कोरा पी एच सी येथे अत्यंत कठीण व गुंतागुंतीची प्रसूती योग्यपणे हाताळली हे कार्य प्रशासनीय आहे."
डॉ.रा.ज. पराडकर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा



